भारुडातून अवयवदानाचा संदेश
नागपूर: ज्योतिबा माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा अभिजात सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ‘अवयवदान हे श्रेष्ठ दान’ हा संदेश देणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अनघा वेखंडे यांच्या भारुड सादरीकरणाने विद्यार्थ्यांमध्ये अवयवदानाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.
