
भार्गव मोकदमची जलतरण स्पर्धेत सुवर्णभरारी; राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
रामटेक: भार्गव मोकदमने वर्धा येथे झालेल्या विभागीय जलतरण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने १०० व २०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात दोन सुवर्ण आणि २०० मीटर वैयक्तिक मेडले प्रकारात एक रजत पदक जिंकले.











