बालकलावंतांच्या सुरांनी रंगली दिवाळी पहाट
नागपूर: बाल रंगभूमी परिषद, नागपूर शाखा, यशवंतराव चव्हाण जिल्हा केंद्र आणि विष्णूजी की रसोई यांच्या संयुक्त विद्यमाने बजाज नगर येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पंधरा वर्षांखालील बालकलाकारांनी विविध सादरीकरणे करून रसिकांची मने जिंकली.
