नागपूर:
बाल रंगभूमी परिषद, नागपूर शाखा, यशवंतराव चव्हाण जिल्हा केंद्र आणि विष्णूजी की रसोई यांच्या संयुक्त विद्यमाने बजाज नगर येथे बालकलावंतांसाठी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात पंधरा वर्षांखालील बालकलाकारांनी अभंग, भजने, भावगीते, लोकगीते आणि चित्रपटगीतांचे सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली. जीविका येंडे हिने सादर केलेल्या गोंधळ नृत्याने विशेष रंगत आणली.
यावेळी श्रीकांत पिसे (कीबोर्ड), प्रमोद बावणे (तबला), अक्षत जाधव (हार्मोनियम) आणि पंकज डांगरे (ऑक्टोपॅड) यांनी संगीतसाथ दिली. श्रीकांत पिसे यांनी संगीत संयोजन केले.कार्यक्रमाच्या प्रारंभात मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन व यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. समारोपप्रसंगी सहभागी बालकलावंतांना पुरस्कार व मिठाई देऊन गौरविण्यात आले. विशेष सत्कार प्रथमेश राऊत आणि चिन्मयी मोरे यांचा करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन सुशील सरोदे यांनी केले.बालकलावंतांच्या सादरीकरणाला नागपूरकर रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.



