‘नवराष्ट्रातील भटकंती’ला महामृत्युंजय पुरस्कार
नागपूर: सुप्रसिद्ध पर्यटन लेखक श्रीकांत पवनीकर यांच्या 'नवराष्ट्रातील भटकंती' या पुस्तकाला महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुस्तकाला मिळालेला हा चौथा पुरस्कार आहे, ज्यामुळे पवनीकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
