नागपूर:
सुप्रसिद्ध पर्यटन लेखक व मुक्त पत्रकार श्रीकांत पवनीकर यांच्या ‘नवराष्ट्रातील भटकंती’ या पुस्तकाला गडचिरोली येथील नाट्यश्री संस्थेतर्फे राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुस्तकाला मिळालेला हा चौथा पुरस्कार आहे.
पवनीकर यांनी भारतातील दुर्लक्षित आणि अनोळखी पर्यटनस्थळांची माहिती प्रत्यक्ष भेटी व निरीक्षणांवर आधारित लेखनातून देण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे. त्यांनी या पुरस्काराबद्दल नाट्यश्री संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नाटककार चुडामण बल्हारपुरे आणि निवड मंडळाचे आभार मानले.पुरस्कार वितरण समारंभ २० डिसेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता गडचिरोली येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात होणार आहे. या पुरस्काराबद्दल श्रीकांत पवनीकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



