*श्री सेवा मंडळाचे 27 वर्षांचे सामाजिक कार्य*

श्री संत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल येथे श्री जैन मंडळाने मागील 27 वर्षांपासून कॅन्सर रुग्णांच्या उपचारासाठी विविध उपक्रम राबवले आहेत.जैन सेवा मंडळाची निर्मिती 1941 मध्ये झाली, परंतु श्री संत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये मागील 27 वर्षांपासून नियमित संध्याकाळचे जेवण देण्यात येत आहे. या कार्यात रुग्णांच्या नातलगांना देखील जेवण दिले जाते, जेणेकरून त्यांना रुग्णांच्या काळजीसाठी आवश्यक असलेला आधार मिळतो.श्री जैन सेवा मंडळाचे हे कार्य केवळ रुग्णांसाठीच नाही तर त्यांच्या कुटुंबीयांसाठी देखील महत्त्वाचे आहे. समाजातील लोकांनी भरभरून पाठिंबा दिला आहे आणि या कार्यास चालना देणारे अनेक दानशूर व्यक्ती व संस्था आहेत. 


एका छोटेखानी कार्यक्रमात कविता शाह, परशा विरेन शाह, विमल राजेश शहा, वीरेन शहा, निर्मला छेडा यांच्या प्रयत्नातून एक लाख रुपये आर्थिक निधी जमा करून जैन सेवा मंडळाच्या स्वाधीन केला. याशिवाय, समाजातील अनेक संस्थांनी या कार्याला पाठिंबा दिला आहे. धीरूभाई अंबानी फाउंडेशनने तीन लाख रुपये, करण कोठारी ज्वेलर्सने 11000 रुपये, श्री संतोष पेंढारी यांनी 11000 रुपये, प्रकाश शाहकार यांनी 5000 रुपये दिले आहेत.कॅन्सर हॉस्पिटलमध्ये कॅन्सर रुग्णांनावर उपचार केला जातो. या भागात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड इथून गरीब रुग्ण उपचारासाठी येतात. 27 वर्षांच्या कार्यात, श्री जैन सेवा मंडळाच्या वतीने रोज नियमाने निशुल्क जेवण देण्यात येते. यामध्ये फळांचे वितरण देखील केले जाते, ज्यामुळे रुग्णांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.