नागपूर ,

ब्राह्मण सेवा मंडळाची  वार्षिक सर्वसाधारण सभा सावरकर नगर प्राथमिक शाळेत  पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी मिलिंद निमदेव होते.सचिव हेमंत पडळकर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर मागील सभेचे इतिवृत्त, वार्षिक हिशेब आणि आगामी वर्षाचे अंदाजपत्रक सर्वानुमते मंजूर करण्यात आले.


अध्यक्ष मिलिंद निमदेव यांनी मंडळाच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. गरजू ब्राह्मण बांधवांना मदत करणे हे मंडळाचे प्रमुख उद्दिष्ट असून, रुग्ण साहित्य केंद्र, औषधवाटप, जुने कपडे संकलन आणि अन्नदान असे उपक्रम राबविले जातात. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी लवकरच ‘आनंदाश्रम’ सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.महाराष्ट्र फार्मासिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल धनंजय जोशी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. पी. के. देशपांडे यांनी हृदयरोग, मधुमेह आणि उच्च रक्तदाब या विषयांवर मार्गदर्शन करून उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.यावेळी नवनियुक्त उपाध्यक्ष प्रणिता देशमुख आणि सहकोषाध्यक्ष श्रीपाद चोरघडे यांनी पदभार स्वीकारला. कोषाध्यक्ष आनंद बडे यांनी आभार मानले, तर सूत्रसंचालन श्वेता गर्गे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रविंद्र जोशी, दिलीप चंद्रायन, प्रतिमा टेमुर्निकर, राधिका बाकरे, दिनेश टेकाडे, किरण पथे, शेखर गावपांडे आणि अभय राजंदेकर यांनी परिश्रम घेतले.