खापा निपानी: 

आदिवासी बांधव व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद फुलविण्याच्या उद्देशाने अवबोध फाऊंडेशनतर्फे खापा निपानी येथे सामाजिक बांधिलकी जपत दीपोत्सव साजरा करण्यात आला. या उपक्रमात दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना जीवनावश्यक अन्नधान्याच्या किट्सचे वाटप करण्यात आले.

फाऊंडेशनच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना नवीन स्कूल बॅग्स भेट देऊन त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. यावेळी लहान मुलांसोबत फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. आदिवासी बांधवांना दिवाळीचा फराळ व मिठाईचे वाटप देखील करण्यात आले.फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले की, 'समाजातील गरजू व वंचित घटकांसोबत सण साजरा करून त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणे, हाच खऱ्या दिवाळीचा संदेश आहे.' या उपक्रमाचे ग्रामस्थांनी मनापासून स्वागत करून संस्थेचे आभार मानले.