नागपूर

 शिक्षक दिनानिमित्त दत्ता मेघे आयुर्वेद विद्यालय, हिंगणा येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. संतोष सूर्यकांत पुसदकर यांनी विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीवर भर न देता जबाबदार व संवेदनशील नागरिक बनावे, असे आवाहन केले.


शिक्षण हे केवळ पुस्तकी ज्ञान नसून व्यक्तिमत्त्व घडविण्याची प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, प्रामाणिकपणा, सामाजिक बांधिलकी व देशप्रेमाची भावना रुजविण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी डॉ. वासवी तोतवार यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत चांगले संस्कार व सकारात्मक विचार आत्मसात करण्याचे आवाहन केले. शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे यशाचा मार्ग सुकर होतो, असे त्यांनी नमूद केले.