सेंट्रल एक्साईज सेवानिवृत्त क्लबची 2026 वार्षिक आमसभा
सेंट्रल एक्साईज सेवानिवृत्त क्लबची 2026 वार्षिक आमसभा काल, 12 जुलै रोजी, मंगलदीप सभागृह, छत्रपति नगर येथे उत्साहात पार पडली. या कार्यक्रमाला 50 सदस्य उपस्थित पस्थित होते.
या आमसभेचा मुख्य उद्देश क्लबच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे व जेष्ठ सदस्यांना मानपत्र देऊन सत्कार करणे हा होता. या कार्यक्रमात क्लबचे अध्यक्ष दिवाकर निस्ताने, उपाध्यक्ष नितीन मराठे व सचिव अनिरुद्ध गुप्ते यांचा समावेश होता.
आमसभेत क्लबच्या गतिविधींचा सातत्याने विकास साधण्यावर चर्चा करण्यात आली. तसेच, सदस्यांची वार्षिक सहल आयोजित करण्यात यावी, असे ठराव देखील घेण्यात आले.



