सामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका ..
रस्त्याच्या कडेला असलेले स्टॉल्स, छोटे दुकानदार किंवा हातगाड्यांवर व्यवसाय करणारे, जे दैनंदिन गरजा आणि खाण्यापिण्याच्या वस्तू सहज उपलब्ध करून देतात. हे स्टॉल्स शहरांच्या अर्थव्यवस्थेचा आणि संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग जरी असला तरी आरोग्याच्या दृष्टिने याकडे गांभिर्याने लक्ष दिले जात नाही. आपल्या
नागपुर शहरातील रस्त्यांच्या कडेला असलेले पाणीपुरीचे, चायनिज चे आणि ईतर खाद्यपदार्थाचे स्टॉल्स हे स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उघडपणे उल्लंघन करत असल्याचे दिसत असून खाद्यपदार्थ उघडेच ठेवले जात असल्याचे निदर्शनास येते, ज्यामुळे जिवाणूंच्या वाढीचा धोका वाढतो आणि सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका संभवतो आहे. याशिवाय हे स्टॉल्स अनधिकृतपणे मुख्य रस्त्यावर किंवा फुटपाथवर लावले जातात, ज्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यास जागा उरत नाही आणि वाहतूक कोंडी होते. तेव्हा संबंधित प्रशासकीय विभागाने अन्नधान्य विभाग/ महानगरपालीका ने डोळेझाक न करता अश्या रस्त्यांच्या कडे ला, फुटपाथवर असलेल्या गाड्यांची/ स्टॉल्सची तात्काळ तपासणी करून कठोर कारवाई करावी तसेच त्यांचे कडील व्यवसायासंबंधी चे वैधता प्रमाणपत्र तपासावे.
संजय श्रौती /९८६०४५१८४०


