चिमुकल्यांना निरोगी आहाराचे धडे

नागपूर ,

 पोदार प्रेप-२, जगन्नाथ नगर येथे ज्युनिअर बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘माझे जग’ या विषयांतर्गत निरोगी आहार व आरोग्यदायी सवयींबाबत मार्गदर्शनपर उपक्रम घेण्यात आला. यावेळी पोषणतज्ज्ञ कविता मोटवानी यांनी अतिथी वक्त्या म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

उपक्रमात, मोटवानी यांनी विद्यार्थ्यांना निरोगी अन्नाची निवड कशी करावी, तसेच दैनंदिन जीवनात कोणत्या चांगल्या सवयी अंगीकाराव्यात, याबाबत सोप्या व आनंददायी पद्धतीने मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत प्रश्नही विचारले. संवादात्मक पद्धतीने झालेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरला.

या उपक्रमाची संकल्पना स्वाती पोपट वस्त यांची होती. सेंटर हेड मोना सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.