नरेंद्रनगर उड्डाणपुलावरील खड्ड्यांनी वाहनचालक त्रस्त

नागपूर : 

नरेंद्रनगर उड्डाणपुलावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसामुळे खड्ड्यांची तीव्रता वाढली असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनी संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, नरेंद्रनगर येथील पीएमजी वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांचीही अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून रस्ते खराब असल्याने पादचारी व वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मनपा व लोकप्रतिनिधींनी तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.