नागपूर पोलिसांना कॅलिग्राफीची भेट; विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उपक्रम
नागपूर :
नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉ. रविंदर कुमार सिंगल यांना पोलीस आयुक्त कार्यालयात सुंदर कॅलिग्राफीची भेट देण्यात आली. या प्रसंगी अर्पित पोतदार व अशोक देशभ्रतार उपस्थित होते.
“सुवच्छा कॅलिग्राफी प्रकल्प” अंतर्गत विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारण्यासोबतच त्यांचा आत्मविश्वास वाढवणे आणि शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा घडवणे हा प्रमुख उद्देश आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, शिस्त आणि सृजनशीलता विकसित होण्यास मदत होणार आहे.
नागपूर शहर पोलिसांकडून समाजोपयोगी उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन दिले जात असून, हा प्रकल्प विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे यावेळी व्यक्त करण्यात आले.



