नागपूर
भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजनी भागाच्या वतीने सामाजिक सद्भाव कार्यक्रमासह सामाजिक सद्भाव यात्रेचे आयोजन करण्यात आले. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता घाट रोड, नागपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याजवळ कार्यक्रम पार पडला.
यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सामाजिक एकोपा, बंधुभाव, परस्पर विश्वास आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी सामाजिक सद्भाव यात्रा आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणून सामाजिक समरसतेची भावना दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख व्यक्ती आणि उपस्थिती
या कार्यक्रमाला पाटीदार समाजाचे समाजकार्यकर्ते व कार्यकारिणी सदस्य श्री. देवाजी पटेल, भाग संघचालक डॉ. रमाकांतजी कापरे, हनुमान नगर संघचालक श्री. ज्ञानेश्वरजी बालपांडे, विदर्भ प्रांत कार्यकारिणी सदस्य श्री. श्रीकांतजी देशपांडे, श्री. रामजी हरकरे, नागपूर महानगर सहकार्यवाह श्री. दिनेशजी गौर, माजी नगरसेवक श्री. विजय चुटेले तसेच अजनी भागातील अन्य पदाधिकारी उपस्थित होते.सामाजिक सद्भाव यात्रेचा मार्ग पटेल टिंबर मार्ट येथून सुरू झाला आणि यामध्ये विविध सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिक यांचा समावेश होता. या उपक्रमाने एकत्र येऊन समाजातील विविध घटकांमध्ये एकता, समरसता आणि बंधुभाव यांचा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला.



