नागपूर, 

विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य, भावनिक संतुलन आणि आंतरिक विकास साधण्याच्या उद्देशाने Ma Iraa Healings आणि Lions Club of Nagpur Metropolitan यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ऑक्टोबर रोजी दिगडोह येथील शांती विद्या भवनमध्ये साउंड हीलिंग व मेडिटेशन सत्राचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांना ध्वनी उपचार आणि ध्यानसाधनेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. शारीरिक, मानसिक आणि भावनिक संतुलन राखण्यासाठी ध्यानाची मदत कशी होऊ शकते, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार, एकाग्रता आणि मनःशांती वाढविण्याचा या उपक्रमाचा उद्देश होता.सत्रात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी साउंड हीलिंगच्या तंत्रांचा अनुभव घेतला आणि ध्यान साधनेच्या माध्यमातून आपल्या मनाची एकाग्रता वाढवण्याचे महत्त्व समजून घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडला.