नागपूर:
दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रातील त्रिमूर्ती नगर मंडळ (प्रभाग ३६-ब) यांच्या वतीने नागरिकांसाठी शासकीय योजना मार्गदर्शन व लाभार्थी शिबिराचे आयोजन १७ ते १९ नोव्हेंबर २०२६ दरम्यान करण्यात आले आहे. सोनेगाव येथील दुर्गा मंदिरात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबिर सुरू राहणार आहे.या शिबिरात विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन व लाभ मिळविण्यासाठी सहाय्य करण्यात येणार आहे. यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या तक्रारींचे निराकरण, आभा कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, लेक लाडकी योजना, राष्ट्रीय वयोश्री योजना, सुकन्या समृद्धी योजना, बाल संगोपन योजना तसेच मेरा राशन ई-केवायसी यांचा समावेश आहे.
या शिबिराचे आयोजन मंडळ अध्यक्ष तथा नगरसेवक ईश्वरडेंगळे, नगरसेविका माया हाडे, सोनेगाव वॉर्ड अध्यक्ष संजय देशमुख आणि मंगेश झोटिंग यांच्या नियोजनातून करण्यात आले आहे.या शिबिराचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देणे आणि त्यांचा लाभ मिळविण्यासाठी आवश्यक ती मदत करणे. यामुळे नागरिकांना त्यांच्या हक्कांच्या योजनांचा लाभ घेता येईल.कागदपत्रांची आवश्यकतशिबिरात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी लागतील, ज्यामध्ये भा कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, लेक लाडकी योजना, राष्ट्रीय वयोश्री योजना, सुकन्या समृद्धी योजना, बाल संगोपन योजना आणि मेरा राशन ई-केवायसी यांचा समावेश आहे.



