महात्मा गांधी जयंतीनिमित्त देवग्राम येथे ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देणारा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात स्थानिक नागरिक, महिला, युवक, विद्यार्थी, शिक्षक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
उपक्रमात गावातील परिसराची स्वच्छता करून विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. प्रा. डॉ. भाऊसाहेब भोगे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. त्यांनी मागील वर्षी आणि यंदाही स्वतःच्या खर्चातून अडीच ते तीन लाख रुपयांची वृक्ष उपलब्ध करून देत गावाच्या विकासासाठी योगदान दिले.ग्रामस्थांनी यावेळी ‘स्वच्छ, सुंदर, विकसित आणि आदर्श गाव’ निर्माण करण्याचा संकल्प व्यक्त केला. ग्रामस्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभागातून देवग्रामच्या विकासाला नवी दिशा देण्याचा निर्धार करण्यात आला.



