नागपूर: 

अंबाझरी तलाव परिसरात पडणारा कचरा पाहून दुर्लक्ष करण्याऐवजी त्रिमूर्तीनगर येथील सेवानिवृत्त अधिकारी वासुदेव वैष्णव यांनी स्वच्छतेचा संकल्प केला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ते दररोज दोन पोती सोबत आणून तलावाच्या काठावरील रिकाम्या बाटल्या, रॅपर्स व अन्य कचरा गोळा करतात आणि अधिकृत कचराकुंडीत टाकतात.

वासुदेव वैष्णव यांचा हा प्रयत्न केवळ स्वच्छतेसाठीच नाही तर स्थानिक समुदायात जागरूकता वाढवण्यासाठी देखील आहे. त्यांच्या पुढाकारातून तलावाच्या पाळीवर काही कचराकुंड्याही ठेवण्यात आल्या आहेत. मात्र, नागरिक अद्याप कचराकुंड्यांचा वापर करत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.वासुदेव वैष्णव यांचे कार्य कोणत्याही मदतीची अपेक्षा न ठेवता देशसेवेच्या भावनेतून चालते. ते म्हणतात, “कोई मदद के लिये आये या ना आये, यह कार्य मैं करता रहूंगा, क्योंकि कोई भी काम इम्पॉसिबल नहीं है.” त्यांच्या कार्यातून सामाजिक बांधिलकी आणि स्वच्छतेचा प्रेरणादायी संदेश मिळतो.स्थानिक नागरिकांमध्ये या उपक्रमाला मिळत असलेला प्रतिसाद अद्याप अपेक्षित असलेला नाही. तरीही, वासुदेव वैष्णव यांचा हा प्रयत्न एक सकारात्मक संदेश देतो, जो इतरांना देखील प्रेरित करतो. स्वच्छता ही केवळ एक जबाबदारी नाही, तर प्रत्येकाच्या जीवनाचा एक भाग आहे, हे त्यांनी स्पष्ट केले आहे.