नागपूर: अंतरराष्ट्रीय मानवाधिकार संगठन, भारत व प्रतिभा बहुदेशीय संस्थेतर्फे भव्य तान्हा पोळा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे हे २७ वे वर्ष असून, सुमारे १५० बालस्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेत विविध वेशभूषा, नंदीबैलाची सजावट आणि सामाजिक संदेश या निकषांवर परीक्षकांनी गुणांकन केले.

पारितोषिके आणि मान्यवरांची उपस्थिती

स्पर्धेतील विजेत्यांना सायकल, स्टडी टेबल, गेम सेट, क्रिकेट बॅट, बॅडमिंटन रॅकेट व फुटबॉल अशी आकर्षक पारितोषिके देण्यात आली. सहभागी सर्व स्पर्धकांनाही बक्षिसे देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन विवेक मेंढी यांनी केले. कार्यक्रमप्रमुख रोहित श्रीवास्तव व मनोज लिल्होरे यांच्यासह व्ही. एन. रेड्डी, अनुसया गुप्ता, अभय देशमुख, दिलीप दिवे, संजय उगले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेकांनी सहकार्य केले.