नागपूर, 

१९७८ मध्ये सुरू झालेली नागपूरची 'वनबाला' ही छोटी जंगल सफारी गाडी म्हणजे केवळ एक वाहन नाही, तर नागपूरकरांच्या बालपणीच्या असंख्य गोड आठवणींचा ठेवा आहे. सेमिनरी हिल्सच्या हिरव्यागार जंगलातून धावणारी ही झुकझुक गाडी एकेकाळी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र होती. कोरोनाच्या काळापासून बंद पडलेली ही गाडी आज दुर्लक्ष आणि देखभाली अभावी आपल्या पुनरुज्जीवनाची वाट पाहत आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की ,महाराष्ट्र वनविभागाकडून तिच्या पुनरुज्जीवनासाठी काही उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्याचे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात ही गाडी पुन्हा सुरू होऊन तिचा आवाज सेमिनेरी हिल्सच्या जंगलात कधी घुमणार, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.वनबाला ही केवळ एक जुनी गाडी नाही, तर नागपूरच्या पर्यटनाचा, निसर्गप्रेमाचा आणि अनेक पिढ्यांच्या भावविश्वाचा एक महत्त्वाचा भाग आहे.



नागपूरचे केंद्रीय मंत्री . नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधित लोकप्रतिनिधी आणि वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे.कारण वनबाला पुन्हा सुरू होणे म्हणजे केवळ एका गाडीचे पुनरुज्जीवन नाही, तर नागपूरकरांच्या बालपणीच्या आठवणींना पुन्हा एकदा नवी झेप देणे आहे!