नागपूर :

कार्तिक महिन्याच्या पावन पर्वानिमित्त बेलिशॉप-मोतीबाग रेल्वे कॉलनी, कामठी रोड येथील प्राचीन श्री शिव मंदिर परिसरात यंदाही भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या या दीपोत्सवात मंदिर परिसर ५००१ दीपांच्या प्रकाशाने उजळून निघणार आहे.यावेळी मंदिर परिसरात भव्य स्वस्तिक साकारण्यात येणार असून तो आकर्षणाचे प्रमुख केंद्र राहणार आहे. विविध रंगांच्या आकर्षक रांगोळ्यांनी सजविलेल्या मंदिर परिसरात दीपांच्या लखलखाटामुळे विलोभनीय आणि भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे, भगवान शिवशंकरांची ५० किलो रंगोळीच्या साहाय्याने २४ फूट बाय १६ फूट आकाराची भव्य रांगोळी साकारण्यात येत आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंडळ रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता, बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर, विजय गुप्ते, जी.एन.आय.चे सीएमडी नवनीतसिंग तुली आणि डॉ. संजय मालवीय विशेष उपस्थित राहणार आहेत.गेल्या १३ वर्षांपासून दक्षिण भारतीय समाजाच्या वतीने हा दीपोत्सव मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा केला जात आहे. कार्तिक महिन्यात दीपदानाला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने नागरिकांनी या दिव्य आणि मनोहारी सोहळ्याचा आनंद घेण्यासोबतच दीपदानात सहभागी होऊन पुण्यलाभ घ्यावा, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शरद शर्मा, उमेश चौकसे, जुगलकिशोर साहू, प्रकाशराव (गुंडू), पी. सत्याराव, पं. कृष्णमुरली पांडे, सी. राजगोपाल राव, प्रेमलाल यादव, गणेश कोतुलवर, श्रीकांत रॉय, रामकृष्ण पटनायक, पी. कन्याकुमारी, विलास खोडे, मनीष नायडू, निर्मला बैंस, सुशीला यादव, आर्या डबली, रमा टीचर, पुष्पा नागोत्रा, शशि यादव, पी. विजय कुमार, ग्रेटी ग्रोवर यांच्यासह सर्व सदस्य सक्रियपणे परिश्रम घेत आहेत.