नागपूर: 

'जंबोची आयुर्वेदिक साहसी सफर' या संकल्पनेवर आधारित वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमातून मुलांनी आपल्या कलागुणांचे, आत्मविश्वासाचे आणि सर्जनशीलतेचे सुंदर प्रदर्शन केले.

कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून गोविंदराव वंजारी आयुर्वेदिक कॉलेजचे प्राचार्य वीरेंद्र शाह उपस्थित होते. त्यांनी आयुर्वेदाची ओळख करून देणारा आणि आनंददायी अनुभवांची शिदोरी देणारा हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा सर्वांसाठी संस्मरणीय ठरला, असे विचार व्यक्त केले.

या कार्यक्रमाची संकल्पना स्वाती पोपट वस्त यांची होती. सेंटर हेड मिस मोना सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहात, आनंदात आणि यशस्वीरीत्या पार पडले. या कार्यक्रमाने मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत, आयुर्वेदाची ओळख करून दिली आणि आनंददायी अनुभवांची शिदोरी दिली.या वार्षिक स्नेहसंमेलनाचा सोहळा सर्व उपस्थितांसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरला, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळाला.