1. आसमान सोसायटीत दीपावली उत्सव नागपूर : आसमान महिला क्रेडिट सोसायटी व आसमान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दीपावली उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पंचमीला श्री महालक्ष्मी पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. सोसायटीचे सन्माननीय ग्राहक दिनेश टेकाडे व दीपिका टेकाडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. सुयोग जोशी गुरुजी यांनी विधिवत पूजा संपन्न केली. यावेळी सोसायटीचे सीईओ डॉ. रवि गि-हे यांनी उपस्थित ग्राहकांना संस्थेच्या विविध ठेव व कर्ज योजनांची माहिती दिली. गरजू नागरिकांना नवीन दागिन्यांच्या खरेदीसाठी वार्षिक १० टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच १३ महिन्यांच्या विशेष मुदत ठेवीवर ९ टक्के आणि बचपन आवर्ती ठेव योजनेवर ९.५ टक्के व्याजदर देण्यात येत असल्याची माहिती दिली.कार्यक्रमाला सोसायटीच्या अध्यक्ष मेघा गि-हे, उपाध्यक्ष विभा विंचुरकर, प्रकाश गोरले, वंदना गोरले, अनिल देव, मधुरा कोलारकर, व्यवस्थापक पायल काले, निहारिका विंचुरकर, संचालक मंडळाचे सदस्य, ग्राहक आणि आसमान फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.उत्सवी वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून ग्राहकांशी संस्थेचे स्नेहबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.