कविवर्य सुरेश भट सभागृहात ११ वा आयुर्वेद दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाची ‘आयुर्वेद सर्वांसाठी हितकर’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेदाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
बदलती जीवनशैली, ताण, अनियमित आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्यांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आयुर्वेदाची भूमिका महत्त्वाची असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आहार-विहार, योग, दैनंदिन जीवनातील आयुर्वेदाचे महत्त्व आणि निरोगी जीवनशैली याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.कार्यक्रमाला प्राचार्य हर्षला राजुरकर, डॉ. संतोष सूर्यकांत पुसदकर, डॉ. अर्चना रोहनकर, डॉ. कौस्तुभ भोयर आणि डॉ. धीरज झाडे यांची उपस्थिती होती.आयुर्वेदाचा प्रसार आणि पारंपरिक ज्ञानाचा आधुनिक जीवनशैलीशी समन्वय साधण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
नागपूर: शासकीय प्रेस सोसायटीतील आदिशक्ती माँ दुर्गा उत्सव मंडळातर्फे पाचव्या वर्षानिमित्त नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. या उत्सवात विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नागपूर: रोहिणी पाटील रामटेके यांचा इस्तंबूल येथे आयोजित आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर गौरव करण्यात आला. साक्षात सक्षमीकरण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षे सुनीता पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
नागपूर, 6 ऑक्टोबर 2026: एम. पी. देव मेमोरियल सायन्स कॉलेजने डॉ. अशोक शेकदार स्मृती अंतर्गत एक महत्त्वाची पॉवर पॉईंट सादरीकरण स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत नागपूर आणि अमरावती विभागातील विविध महाविद्यालयांनी सहभाग घेतला.