नागपूर
कमाल चौकातील स्व. भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटर येथे डायलिसीस सुविधेचा विस्तार करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कांचन गडकरी आणि अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. संजीव चौधरी यांच्या हस्ते २१ सप्टेंबर रोजी या सुविधेचे लोकार्पण झाले.
केंद्रात पूर्वी पाच रुग्णांसाठी डायलिसीसची सुविधा होती. आता पाच नवीन मशीन्समुळे दहा रुग्णांवर डायलिसीस करता येणार आहे. लवकरच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ही सुविधा निःशुल्क उपलब्ध होणार आहे. केंद्रात एमआरआय, सीटी स्कॅन, ईसीजी, ईईजी, एक्स-रे, सोनोग्राफी, इको यांसह विविध तपासण्यांच्या सुविधा अल्पदरात उपलब्ध आहेत.यावेळी आमदार डॉ. राजीव पोतदार, सारंग गडकरी, प्रभाकर येवले, अविनाश घुशे, अतुल मंडलेकर यांच्यासह डॉक्टर व मान्यवर उपस्थित होते.



