दहावी-बारावीच्या निकालात भिडे हायस्कूलचा झेंडा फडकला
नागपूर,
नागपूर : भिडे हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी व बारावी बोर्ड परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करत आपली यशाची परंपरा कायम राखली आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा तसेच शाळेतील नवीन सुविधांच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
दहावीचा निकाल ९८.२१% लागला असून अनिरुद्ध अजय रामटेके याने ९१% गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. शर्वरी राकेश पाचभाई हिने द्वितीय क्रमांक मिळवला. तर बारावीमध्ये विज्ञान शाखेचा निकाल ९९.३५%, वाणिज्य शाखेचा १००% आणि कला शाखेचा ८०% लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब नंदनपवार, सचिव अॅड. विवेक सोनटके तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते नवीन लिफ्ट आणि स्वच्छतागृहाचे भूमीपूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालकांनी स्वागत केले.



