नागपूर ,

दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त रेल्वे लोको पायलट व उत्कृष्ट वाइल्डलाईफ फोटोग्राफर म्हणून परिचित असलेले अभिषेक बन्सोड यांनी आपल्या कल्पकतेतून आकर्षक शिवकालीन किल्ल्याची निर्मिती केली.

अभिषेक बन्सोड यांचा कलात्मक किल्ला !

किल्ल्याची सुबक रचना, आकर्षक सजावट, रोषणाई आणि बारकाव्यांनी सजलेला जिवंत देखावा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता. या कलाकृतीतून शिवकालीन इतिहासाची सुंदर आठवण करून देण्यात आली. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संगठन, भारतचे राष्ट्रीय अध्यक्ष विवेक मेंढी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण व आरती करून अभिवादन करण्यात आलेयावेळी अभिषेक बन्सोड यांनी विवेक मेंढी यांचे झाडाचे रोपटे भेट देऊन स्वागत केले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरला.या प्रसंगी संगठनचे नागपूर शहर उपाध्यक्ष रविंद्र पोतदार, अभिषेक बन्सोड, बन्सोड काकू आणि श्रीता बन्सोड उपस्थित होते. अभिषेक बन्सोड यांच्या मेहनतीचे व कलात्मक कल्पकतेचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले.