नागपूर,  

अमर सेवा मंडळ संचलित गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे १४ सप्टेंबर रोजी प्राचार्य डॉ. सलीम चव्हाण यांच्या हस्ते श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. यावेळी अभियांत्रिकी, बी.ए.एम.एस. व नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी सहभागी झाले.

गणेशोत्सवानिमित्त रांगोळी, फूड फेस्ट, बॉक्स क्रिकेट, कबड्डी तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विठ्ठलाची दिंडी, रामस्तुती आणि लेझिम गजराने उत्सवात रंगत भरली. डॉ. सुहासिनी वंजारी, अॅड. अभिजित वंजारी, डॉ. स्मिता वंजारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उत्सव उत्साहात पार पडला.