नागपूर
हरित पर्यावरण, सुंदर समाज आणि समृद्ध भविष्याचा संदेश देत सुप्रभात परिवार फाउंडेशन, गोटाळ पांजरी यांच्या वतीने वेळाहरी येथील सुप्रभात चौकात २० सप्टेंबर रोजी वृक्षारोपण व चौक फलक अनावरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. डी. एन. शिंगाडे होते. सरपंच प्रीती सचिन इंगळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मनीषा राजेंद्र राजूरकर, भावना रामटेके, आकाश पिसार, पत्रकार दिलीप शिरभाते यांच्यासह नागरिक उपस्थित होते.‘एक झाड अनेक श्वास, एकत्र येऊया, हरित भविष्य घडवूया!’ या संदेशातून पर्यावरण संवर्धनाचा जागर करण्यात आला. ‘झाडे लावा, झाडे जगवा, जीवन समृद्ध करा’ या संकल्पनेतून स्वच्छ परिसर व हरित समाज निर्मितीचा संदेश देण्यात आला.



