नागपूर:

प. पू. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ संचालित निकालस महाराज योगासन वर्ग, खामला यांच्या वतीने ‘दीपोत्सव २०२६’ या कार्यक्रमांतर्गत विविध सामाजिक विषयांवर जनजागृती करणाऱ्या सहा लघुनाटिकांचे सुंदर सादरीकरण करण्यात आले.

या सर्व लघुनाटिकांचे दिग्दर्शन योगसाधिकासुलभा कुलकर्णी यांनी अतिशय उत्कृष्टपणे केले. विविध योगकेंद्रांतील योगसाधकांनी या नाटिकांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या. कार्यक्रमाला योगाभ्यासी मंडळाचे कार्यवाह मिलिंद वझलवार , उपाध्यक्ष . नानेकर ,सिरसीकर तसेच सावदेकर  आणि इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पाहुण्यांचा सत्कार झाल्यानंतर एकापाठोपाठ एक अशा सहा जनजागृतीपर लघुनाटिकांचे सादरीकरण करण्यात आले. या नाटिकांना नरेंद्र पाखरे यांनी उत्कृष्ट पार्श्वसंगीताची साथ दिली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने योगसाधक तसेच इतर रसिक प्रेक्षक उपस्थित होते. सर्वांनी या आगळ्यावेगळ्या दीपोत्सवाचा मनमुराद आनंद घेत कलाकारांचे कौतुक केले आणि आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली.