नागपूर : 

गुरुदेव नगर येथे स्थानिक मंडळाच्या वतीने देवशयनी आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेत नामस्मरणात सहभाग घेतला.

मंदिर परिसर "पांडुरंग पांडुरंग", "राम कृष्ण हरी" आणि "ज्ञानोबा-तुकाराम" यांच्या अखंड नामघोषाने दुमदुमून गेला. विघ्नहर्ता योग नृत्य ग्रुप, टायगर ग्रुप ऑफ अॅडव्हेंचर नागपूर, श्री हनुमान मंदिर विश्वस्त मंडळ, श्री जवाहर को-ऑप. हाऊसिंग सोसायटी, विविध योगा ग्रुप, संघ प्रभात शाखा गुरुदेव नगर, श्री गणेशोत्सव मंडळ, वारकरी पथक व रमणा मारोती मंदिर भजन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.