नागपूर - 

श्री संत गजानन महाराज सेवा ट्रस्ट, निर्मल नगरी यांच्या वतीने रविवार, १५ नोव्हेंबर रोजी नागपूर ते कोराडी भव्य पायदळ दिंडी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे २० किलोमीटरच्या या भक्तिमय यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

दिंडीचा प्रारंभ

दिंडीला सकाळी ६ वाजता निर्मल नगरी येथून प्रारंभ होईल. या मार्गात संस्कारधाम चौक, गणेशपेठ बसस्थानक, कॉटन मार्केट, गणेश टेकडी, आरटीओ कार्यालय, सदर, ताजुद्दीन बाबा दर्गा (पागलखाना), झिंगाबाई टाकळी आणि मानकापूर यांचा समावेश आहे.

दिंडीचे आगमन आणि कार्यक्रम

दुपारी १२.३० वाजता दिंडीचे आगमन होणार आहे. दुपारी १ वाजता महाआरती होईल, त्यानंतर १.३० ते २ या वेळेत प्रवचन व कीर्तन होईल. दुपारी २ वाजल्यापासून भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

भाविकांचे आवाहन

श्री संत गजानन महाराजांच्या नामस्मरणात आणि भजन-कीर्तनाच्या गजरात निघणाऱ्या या दिंडीत सहभागी होऊन श्रींचे व श्री महालक्ष्मी जगदंबा मातेचे आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.