नागपूर

एम. पी. देव मेमोरियल धरमपेठ सायन्स कॉलेजतर्फे डॉ. अशोक शेकदार स्मृतीअंतर्गत आंतरमहाविद्यालयीन पॉवर पॉईंट सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. नागपूर व अमरावती विभागातील विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.स्पर्धेत जनरेटिव्ह एआय, क्वांटम कम्प्युटिंग, पर्यावरणीय बदल, शाश्वत विकास तसेच आधुनिक जीवनशैली आणि आरोग्यावरील परिणाम अशा समकालीन विषयांवर विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.

स्पर्धेत नागपूरच्या शिवाजी सायन्स कॉलेजची शगुप्ता बशीर हिने प्रथम, तर शंकरनगर येथील एल.ए.डी. कॉलेजची निलाक्षी वाघमारे हिने द्वितीय क्रमांक पटकावला. हिस्लॉप कॉलेजच्या विशाल सिंग याला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. उत्कृष्ट कामगिरीबद्दल शिवाजी सायन्स कॉलेजला फिरती चषक प्रदान करण्यात आली. विजेत्यांना रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देण्यात आली.हिस्लॉप कॉलेजच्या संगणक विज्ञान विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. ममता बहेटी आणि एल.ए.डी. कॉलेजच्या प्राणिशास्त्र विभागाच्या सहायक प्राध्यापिका डॉ. देवश्री नगरकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.संस्थेचे अध्यक्ष अॅड. उल्हास औरंगाबादकर, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष डॉ. विलास देशपांडे, प्राचार्य पितांबर हुमणे, उपप्राचार्य कॅप्टन डॉ. प्रशांत आंबेकर, आयक्यूएसी समन्वयक डॉ. नितीन गायकवाड आणि नॅक समन्वयक वर्षा रंगारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.