डॉ. विजयकुमार टाटा यांना पीएच.डी. प्रदान
नागपूर,
डॉ. विजयकुमार टाटा यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यापीठ, इंदूर येथून व्यवस्थापनशास्त्र विषयात डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.) ही मानाची पदवी प्रदान करण्यात आली आहे.त्यांनी “A Study on the Impact of Performance Management System on Employee Performance” या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला. हे संशोधन डॉ. विनायक खरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पूर्ण झाले.
या संशोधनात कार्यप्रदर्शन व्यवस्थापन प्रणालीचा कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर होणारा परिणाम सखोलपणे अभ्यासण्यात आला आहे. संस्थांमधील कर्मचाऱ्यांची उत्पादकता, कार्यक्षमता आणि कामाचा दर्जा उंचावण्यासाठी कार्यप्रदर्शन व्यवस्थापन प्रणालीची भूमिका किती महत्त्वाची आहे, यावर या संशोधनातून प्रकाश टाकण्यात आला आहे.डॉ. विजयकुमार टाटा हे स्वर्गीय श्रीमती लक्ष्मी आणि स्वर्गीय श्री वेंकट राव टाटा यांचे सुपुत्र आहेत. या महत्त्वपूर्ण शैक्षणिक यशाबद्दल त्यांनी आपले संशोधन मार्गदर्शक डॉ. विनायक खरे, सहकारी, मित्रमंडळी तसेच कुटुंबीयांप्रती विशेष कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या मार्गदर्शन, प्रोत्साहन, आशीर्वाद आणि सातत्यपूर्ण सहकार्यामुळेच हे यश संपादन करणे शक्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.



