नागपूर,

 जानकी नगर येथील सिद्धेश्वरी सेवा वस्तीमध्ये रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता दिवाळी मिलन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी भाग संघचालक मनोहरजी सपकाळ यांनी बालगोपालांशी संवाद साधत दिवाळीचे महत्त्व व सण साजरा करण्यामागील उद्देश समजावून सांगितला.

यानंतर बालगोपाल व त्यांच्या पालकांना दिवाळी फराळ, भेटवस्तू, शालेय उपयोगी साहित्य आणि फटाक्यांचे वाटप करण्यात आले. या भेटवस्तूंमुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. हा कार्यक्रम भाग समरसता गतिविधी प्रमुख गंगाधरराव इंगळे गुरुजी, भाग सह सेवा प्रमुख अमितजी वनकर, नगर सेवा प्रमुख अमोलजी बोंद्रे आणि जानकी नगर कार्यवाह माहीमजी सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाला वस्तीतील सुमारे १५० नागरिक उपस्थित होते. स्थानिक कार्यकर्ते व सेवा वस्ती प्रमुख बादलजी उईके यांच्यासह जानकी नगर, विठ्ठल नगरचे कार्यवाह आणि स्वयंसेवकांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले. 'भारत माता की जय' आणि 'शहीद भगवान बिरसा मुंडा की जय' या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.