नागपूर,
‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या निमित्ताने शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी सकाळी ७.३० वाजता शंकरनगर येथील सरस्वती विद्यालयाला आकस्मिक भेट दिली. यावेळी त्यांनी सकाळच्या प्रार्थना सभेत विद्यार्थ्यांसोबत प्रार्थना व राष्ट्रगीत म्हटले.
यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक अनुभवांची माहिती घेतली. तसेच वर्गखोल्या, विज्ञान प्रयोगशाळा आणि शैक्षणिक सुविधांची पाहणी केली. यावेळी नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवलिंग पटवे, DIETच्या प्राचार्य डॉ. हर्षलता, माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल दहिफळे आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश गुंड उपस्थित होते.मुख्याध्यापिका डॉ. रेशमी उमेश व प्राथमिक विभागाचे प्रभारी सोनू परास्कर यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. शिक्षणमंत्र्यांच्या या भेटीमुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.



