अतिक्रमणामुळे नरेंद्र नगर चौक बनला धोकादायक!

नागपूर :

 नरेंद्र नगर चौकातून वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर व फुटपाथवरील अतिक्रमणामुळे वाहनधारक व पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. पंचर दुकाने, फुलविक्रेते, पाणीपुरी व फेरीवाल्यांनी अवैधरित्या स्टॉल व पथाऱ्या लावल्याने रस्ता अरुंद झाला असून वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे.

या मार्गावर एसटी बसेस, स्कूल बसेस तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा उरलेली नसून विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व वाहनधारकांसाठी हा परिसर अपघातप्रवण ठरत आहे.नागरिकांनी महापालिका, पोलीस प्रशासन व संबंधित विभागाकडे अनेकदा तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे. संबंधित विभागाने तातडीने अतिक्रमण हटवून नागरिकांना सुरक्षितता द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

 संजय श्रौती