सकल हिंदू समाज खरे नगरच्या वतीने आयोजित भव्य सामूहिक तुळशी विवाह सोहळा कार्तिकी पौर्णिमेच्या गोरज मुहूर्तावर रजत महोत्सव शाळेत भक्तिभावाने व उत्साहात संपन्न झाला. सोहळ्याच्या दोन दिवस आधी आयोजित मेहंदी कार्यक्रमात सुमारे ५० महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
सोहळ्यानिमित्त लक्ष्मीनारायण मंदिरापासून विवाहस्थळापर्यंत आकर्षक रांगोळ्या व पारंपरिक सजावट करण्यात आली होती. सायंकाळी ६ वाजता लक्ष्मीनारायण मंदिरातून भगवान श्रीकृष्णाची फुलांनी सजविलेल्या कारमधून शाही वरात काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषेतील चिमुकल्या करवल्यांनी मंगल कलश व आरतीचे तबक हातात घेतले होते.वरातीदरम्यान बालकांसह नागरिकांनी पारंपरिक गाण्यांवर नृत्य केले. फटाक्यांच्या आतषबाजीने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. विवाहस्थळी पोहोचल्यानंतर सुवासिनींच्या हस्ते भगवान श्रीकृष्ण व चिमुकल्या देवतांचे स्वागत करण्यात आले. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.
नागपूर: महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) मुख्यालयात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
वनबाला गाडी, १९७८ मध्ये स्थापन झालेली, आज नागपूरच्या जंगलात बंदिस्त आहे. या गाडीने अनेक वर्षे शहरातील मुलांना आनंद दिला, परंतु आज तिची अवस्था चिंताजनक आहे.
नागपूरच्या प्राचीन श्री शिव मंदिर परिसरात ५००१ दीपांच्या प्रकाशात भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात आकर्षक रांगोळ्या आणि ३० फुटांचा स्वस्तिक सजविला जाणार आहे.