नागपूर :

या कार्यक्रमाला अतिरिक्त पोलीस आयुक्त विनिता साहू, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक गणेश मुळे, ज्येष्ठ पत्रकार मनीष अवस्थी, सत्येंद्र प्रसाद सिंह यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.डॉ. डबली यांनी सामाजिक प्रश्न, जनहित, पर्यावरण संवर्धन आणि नागपूरमधील ऐतिहासिक विहिरींच्या संरक्षणासाठी सातत्याने लेखणीद्वारे आवाज उठविला आहे.या सन्मानाबद्दल भावना व्यक्त करताना डॉ. डबली म्हणाले की, राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने मिळालेला हा सन्मान त्यांच्या ३५ वर्षांच्या पत्रकारिता प्रवासातील सामाजिक आणि जनहितकारी कार्याची महत्त्वपूर्ण पावती आहे. या गौरवाबद्दल त्यांनी आयोजक संस्था, उपस्थित मान्यवर आणि सर्व हितचिंतकांचे आभार मानले.