नागपूर,
बेलदार सेवा समिती, नागपूरचा २२ वा वर्धापन दिन तसेच गुणवंत विद्यार्थी व समाजबांधव सत्कार सोहळा हजारी पहाड येथील बेलदार समाज भवनात उत्साहात पार पडला. शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. संत हरिहर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बेलदार समाजाच्या रूढी-परंपरांचे दर्शन घडविणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन श्रीधरराव बढिये यांच्या हस्ते झाले. सुनीता दाभाडे यांच्या हस्ते एसटी महामंडळाच्या एनसीएमसी कार्डचे वाटप करण्यात आले. माधव नेत्रालय व रोशनी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी शिबिरही घेण्यात आले.
इयत्ता दहावीमध्ये ७५ टक्के व बारावीमध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसह पदवी, पदव्युत्तर शिक्षण, क्रीडा व साहित्य क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा शाल, आकर्षक बॅग, स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी डॉ. मिथुन खरेडे व अॅड. श्रेयस बढिये यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती, फेलोशिप, शैक्षणिक कर्ज तसेच देश-विदेशातील उच्च शिक्षणाच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. दिनेश गेटमे यांनी जात.


