कामठी पॉलीटेक्निकमध्ये मायनिंग विद्यार्थी परिषदेचे उद्घाटन
कामठी, दि. ९ ऑक्टोबर २०२६: कामठी पॉलीटेक्निकमध्ये स्टुडंट्स असोसिएशन ऑफ मायनिंग इंजिनिअरिंग (SAME) या मायनिंग विद्यार्थी परिषदेचे उद्घाटन उत्साहात पार पडले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.
कामठी पॉलीटेक्निकच्या मायनिंग अँड माइन सर्व्हेइंग विभागातर्फे स्टुडंट्स असोसिएशन ऑफ मायनिंग इंजिनिअरिंग (SAME) या विद्यार्थी परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी उत्साहात झाले.वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे जनरल मॅनेजर (मायनिंग) राजेश कुमार सिंग चौहान आणि रॉकटेक इंजिनिअरिंग प्रा. लि., नागपूरचे संचालक डॉ. मनोज दामोदर गुरहारिकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य एम. बी. घोळसे अध्यक्षस्थानी होते.
प्रारंभी विभागप्रमुख प्रा. रवींद्र साधू यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक ज्ञान, नेतृत्वगुण, संघभावना आणि व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यासाठी विद्यार्थी परिषद महत्त्वाची ठरणार आहे. या माध्यमातून कार्यशाळा, चर्चासत्रे आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक विकासाला चालना मिळेल.
नागपूर: शासकीय प्रेस सोसायटीतील आदिशक्ती माँ दुर्गा उत्सव मंडळातर्फे पाचव्या वर्षानिमित्त नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. या उत्सवात विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नागपूर: रोहिणी पाटील रामटेके यांचा इस्तंबूल येथे आयोजित आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर गौरव करण्यात आला. साक्षात सक्षमीकरण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षे सुनीता पाटील यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
नागपूर, 6 ऑक्टोबर 2026: एम. पी. देव मेमोरियल सायन्स कॉलेजने डॉ. अशोक शेकदार स्मृती अंतर्गत एक महत्त्वाची पॉवर पॉईंट सादरीकरण स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत नागपूर आणि अमरावती विभागातील विविध महाविद्यालयांनी सहभाग घेतला.