1. फिजिका फोरमचा शुभारंभ नागपूर : यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातर्फे फिजिका स्टुडंट फोरम २०२६-२७ चा स्थापना समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आतिश दर्यापूरकर (IIIT नागपूर) आणि विभागप्रमुख डॉ. विक्रांत गणवीर उपस्थित होते. यावेळी नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. अध्यक्षपदी शंतनू इखार, उपाध्यक्षपदी सौम्या देशपांडे, सचिवपदी प्रसाद सराफ आणि संयुक्त सचिवपदी ओम लखे यांची निवड झाली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा बॅज व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.डॉ. आतिश दर्यापूरकर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. तर डॉ. विक्रांत गणवीर यांनी मागील वर्षातील फोरमच्या उपक्रमांचा आढावा घेतला. माजी कार्यकारिणीचाही यावेळी गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे समन्वयन डॉ. भारती पाटील यांनी केले.