नागपूर:
नागपुरातील नागरिकांना विविध सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देणाऱ्या ‘शैलेश मल्टी सर्व्हिसेस’चा उद्घाटन सोहळा ११ ऑक्टोबर रोजी उत्साहात पार पडला. मनोजभाऊ घोडमारे यांच्या हस्ते फीत कापून या प्रतिष्ठानाचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन सोहळा
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्योतिषतज्ज्ञ सुनीलजी तांदूळकर गुरुजी उपस्थित होते. त्यांनी नवीन व्यवसायाला शुभेच्छा देत ग्राहकांना प्रामाणिक व तत्पर सेवा देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांनी व्यवसायाच्या यशाबद्दल सकारात्मक भावना व्यक्त केल्या.
प्रमुख उपस्थिती
यावेळी कोटनायके परिवारासह राजेश नैताम, अक्षय उरेवार, नीतीन कांबे, सचिन पोयाम आणि वीरू उईके यांची प्रमुख उपस्थिती होती. परिसरातील नागरिक, स्नेही व मित्रपरिवारानेही कार्यक्रमाला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.



