ऊंटखाना मराठी प्राथमिक शाळा येथे स्वातंत्र्य दिन सोहळा
नागपूर
ऊंटखाना मराठी प्राथमिक शाळा, मनपा नागपूर येथे स्वातंत्र्य दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात नगरसेवक सुजाता कोंबाडे, सुहास नानवटकर व मुख्याध्यापिका संध्या थोटे उपस्थित होते.
या सोहळ्यात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण, दीपप्रज्वलन व थोर पुरुषांच्या प्रतीमेला माल्यार्पण करण्यात आले. सामुहिक राष्ट्रगीत व वंदेमातरम तसेच जय घोषणाने परीसर दुमदुमला. सोहळ्यातील मुख्य संदेश होता की, स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून मिळाले आहे. त्यामुळे ते टिकवून ठेवण्यासाठी आपण देशासाठी सकारात्मक कार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.



