देवग्राम: 

ग्रामपंचायत व अंत्योदय मिशन, देवग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने ‘देवग्राम ग्राम विकास प्रकल्पा’अंतर्गत गावाला हरित व पर्यावरणपूरक बनविण्याच्या उद्देशाने ५०० नारळाच्या रोपांची सामूहिक लागवड करण्यात येणार आहे.

रविवार, दिनांक ८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजून १० मिनिटांनी एकाच वेळी ५०० नारळाच्या रोपांची लागवड करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर गावातील प्रत्येक कुटुंबाला दिवाळी भेट म्हणून एक नारळाचे रोप देण्यात येणार आहे.

या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट वृक्षसंवर्धन, पर्यावरण संरक्षण व लोकसहभागातून स्वयंपूर्ण गावनिर्मितीचा संदेश देणे आहे. हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन सकाळी ८ वाजता करण्यात आले आहे.