कामठी

श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी, कामठी (स्वायत्त महाविद्यालय) येथे जागतिक फार्मासिस्ट दिन व राष्ट्रीय फार्मसी सप्ताहानिमित्त रोगाणुरोधी प्रतिरोध (AMR) या विषयावर जनजागृती करण्यासाठी नुक्कड नाटक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद जे. उमेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेचे नोडल अधिकारी म्हणून डॉ. आर. टी. लोहिया यांनी काम पाहिले. स्पर्धेचे समन्वयन डॉ. रेणुका दास व डॉ. सुप्रिया शिधये यांनी केले, तर परीक्षक म्हणून डॉ. रश्मी त्रिवेदी व डॉ. जयश्री ताकसांडे यांनी जबाबदारी सांभाळली.स्पर्धेत सहा संघांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी अँटिबायोटिक औषधांचा अयोग्य वापर, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे आणि उपचारक्रम अर्धवट सोडण्याचे दुष्परिणाम यांविषयी प्रभावी नाट्यप्रयोग सादर करून जनजागृती केली. स्पर्धेत ‘फार्मा वॉरियर्स’ संघाने उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला.या उपक्रमातून अँटिबायोटिक औषधांचा विवेकपूर्ण वापर आणि रोगाणुरोधी प्रतिरोध रोखण्यासाठी जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाला विद्यार्थी व प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.