महापौर निता ठाकरे यांनी घेतला तयारीचा आढावा
नागपूर,
नागपूरच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक असलेल्या मारबत महोत्सवासाठी महापालिका सज्ज झाली आहे. ११ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बडग्या-मारबत महोत्सवाच्या तयारीचा आढावा महापौर निता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
यावेळी महापौरांनी मारबत मार्गावर नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये तसेच पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. महोत्सवासाठी येणाऱ्या मान्यवरांच्या शिष्टाचाराचे योग्य पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.महोत्सवाच्या निमित्ताने भजनसंध्या, छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनासह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीला स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम यांच्यासह मनपाचे अधिकारी उपस्थित होते.



