वर्धा रोडवरील नागरिकांकडून गडकरींना निवेदन

नागपूर :

वर्धा रोडवरील सहारा सिटीच्या मागील सोसायटींना मार्ग उपलब्ध करून देणे तसेच आउटर रिंग रोडवरील टोल प्लाझा हटविण्याच्या मागणीसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देण्यात आले.

५ एप्रिल रोजी खामला येथील त्यांच्या कार्यालयात आयोजित जनसंपर्क कार्यक्रमात रुई पांजरी परिसरातील हिबीस्कस गार्डन, ग्रीन सिटी व रोज गार्डन सोसायटीच्या रहिवाशांनी आपली समस्या मांडली. परिसरातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी अडचणी येत असल्याने योग्य मार्गाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.यावेळी अनिल मेश्राम, शशिप्रकाश शर्मा, निशा गजभिये, प्रतीक बाऱ्हे, अरुण दरेकर, आदर्श शर्मा आदी नागरिक उपस्थित होते.